

tarini
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारिणी' सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. सध्या मालिकेत निरनिराळे ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे टीआरपीमध्ये मालिकेने टॉप ५ मध्ये स्थान मिळवलंय. त्यात आता मालिकेत नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. मालिकेत टीम तारिणीची नवीन बॉस म्हणून एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. या बॉसचं नाव जेजे असून सगळेच त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. नुकताच या ऑफिसरच्या एंट्रीचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. आता त्या अभिनेत्रीचा चेहरा समोर आलाय. पाहा कोण आहे ही अभिनेत्री?