
tharla tar mag jyoti chandekar replacement
ESAKAL
स्टार प्रवाहावरील सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलेली मालिका 'ठरलं तर मग' च्या प्रेक्षकांची संख्या प्रचंड मोठी आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील पुर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. त्यानंतर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. मालिकेत आता पुर्णा आजीची जागा कोण घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोबतच ती जागा कुणाला देऊ नका असंही नेटकऱ्यांनी सांगितलं होतं. आता पुर्णा आजीची जागा घेण्यासाठी स्टार प्रवाहाने योग्य व्यक्ती शोधली असल्याचं सांगितलं जातंय.