

SAVLYACHI JANU SAWALI SERIAL SHOOTING
ESAKAL
झी मराठीवरील 'कमळी' ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. झी मराठीच्या मालिकांमध्ये टीआरपी यादीत सगळ्यात वर असणारी ही मालिका गेले काही आठवडे प्रेक्षकांना धक्क्यावर धक्के देतेय. मालिकेत नवनवीन ट्वीस्ट आणले जातायत. 'कमळी' ने अन्नपूर्णा आजीला बरं वाटावं म्हणून घरात प्रवेश केला होता तो ही तिची नात बनून. त्यानंतर अन्नपूर्णा आजीला बरंही वाटलं. मात्र आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोवरून प्रेक्षक पुन्हा एकदा संतापले आहेत. अन्नपूर्णा आजी कमळीला पुन्हा घराबाहेर काढतेय असं यात दाखवण्यात आलंय. मात्र त्यासोबतच आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात मालिकेत नवीन एंट्री होणार आहे हे दाखवण्यात आलंय.