
HAQ MOVIE TEASER
ESAKAL
यापूर्वीही बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले हे खऱ्या आयुष्यावर आधारित होते. मात्र आता पहिल्यांदाच मुस्लिम स्त्रीच्या हक्काबद्दल बोलणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाह बानो बेगम यांच्या संघर्षावर आधारित 'हक' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाह बानो बेगम यांच्या खटल्यावर आधारित आहे. या चित्रपटात यामी गौतम धर आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहेत. सुपर्ण एस. वर्मा यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.