
Entertainment News : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आपल्या भांडणांमुळे चर्चेत राहिलेली निक्की तांबोळी आता मोठ्या पडद्यावर नवा धमाका करणार आहे. निक्की लवकरच पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, ‘बदनाम’ या आगामी चित्रपटातील आयटम साँगद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जय रंधावा, जास्मिन भसीन आणि मुकेश ऋषी मुख्य भूमिकेत असून, तो चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे.