
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार निळू फुले यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांनी अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिका साकारल्या. मात्र त्यांच्या या भूमिका इतक्या जबरदस्त होत्या की गावागावात बायका त्यांच्या नावाने बोटं मोडायचा. निळू भाऊ म्हणजे व्हिलन हे समीकरणच झालं होतं. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी गार्गी फुले या देखील अभिनय क्षेत्रात उतरल्या. वेगवेगळ्या मालिकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या गार्गी फुले एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.