खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया; कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा ट्रेलर प्रदर्शित

BHAGUBAI TRAILER RELEASE : ‘भागूबाई’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘भागूबाई’ या खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया पाहायला मिळते.
bhagubai

bhagubai

esakal

Updated on: 

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘भागूबाई’ या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत दिसणार असून आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ग्रामीण महाराष्ट्राच्या रंगतदार पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट २४ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘भागूबाई’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘भागूबाई’ या खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया पाहायला मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com