

nirmiti sawant
esakal
छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा, असा प्रेक्षक भेटणार नाही ज्यालानिर्मिती सावंत ही अवलिया कलाकार ठाऊक नाही. 'गंगुबाई नॉन मॅट्रिक' या कार्यक्रमातून निर्मिती यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्यांनी त्यांचं प्रत्येक चित्रपटातलं पात्र अतिशय सुंदर साकारलं. त्यामुळेच मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचा 'अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं कौतुक होतंय. मात्र निर्मिती कायम प्रत्येक सिनेमाच्या निर्मात्याकडे दोन गोष्टींची मागणी करतात. ज्या त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात. काय आहेत त्या दोन गोष्टी.