

nivedita saraf
esakal
छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पोडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर राज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ लवकरच 'कृष्णाईच्या लेकी' या मालिकेत दिसणार आहेत. 'बंधन', 'अग्गंबाई सासूबाई', 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. निवेदिता यांनी हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. आता कृष्णाईच्या लेकीच्या निमित्ताने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत हिंदीत काम करण्याचा अनुभव सांगितलाय.