
NIVEDITA AND ASHOK SARAF
ESAKAL
लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. निवेदिता यांनी हट्टाने त्यांच्याशी लग्न केलं. पण निवेदिताशी लग्न करणं ही आपण केलेली एकमेव चांगली गोष्ट आहे असं अशोक म्हणाले होते. निवेदिता आणि अशोक मामा दोघेही मराठी मालिकांमध्ये झळकतायत. नुकतीच निवेदिता यांनी लोकमत फिल्मीच्या युट्यूब चॅनेलवर हजेरी लावली होती. यात त्यांनी त्यांच्या इतर कलाकारांसोबतच्या मस्तीचे अनेक किस्से सांगितले. त्यावेळी त्या अशोक सराफ यांच्याबद्दलही बोलल्या.