
nivedita saraf ON TEJASHREE PRADHAN
ESAKAL
मराठमोळ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. अनेक सुपरहिट चित्रपटात त्यांनी भूमिका केलीये. 'धुमधडाका', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी', 'अशी ही बनवाबनवी' अशा चित्रपटातून त्या घराघरात पोहोचल्या. त्यांनी 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतुन त्यांनी छोट्या पडद्यावरही धमाकेदार एंट्री केली होती. या मालिकेत त्यांच्यासोबत तेजश्री प्रधान होती. सध्या छोट्या पडद्यावरील टॉप अभिनेत्रींनमध्ये तेजश्रीचा समावेश होतो. तेजश्रीचा स्वतःचा असा चाहतावर्ग आहे. आता या मालिकेच्या सेटवर तेजश्री कशी वागायची हे निवेदिता सराफ यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.