
ashi hi banva banvi
ESAKAL
'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. मराठी सिनेसृष्टीसाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. प्रेक्षकांनी या चित्रपटासाठी थिएटरमध्ये तुडुंब गर्दी केली होती. या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुशांत रे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर आणि अश्विनी भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या कलाकारांनी हा सिनेमा अजरामर केला. हा सिनेमा सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा आजही टीव्हीवर मोठ्या आवडीने पाहिला जातो. मात्र या सिनेमाच्या शुटिंगवेळी एक धमाल किस्सा घडला होता. जो निवेदिता यांनी मुलाखतीत सांगितला आहे.