

NIVEDITA SARAF
esakal
मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचा मनात वेगळं स्थान निर्माण केलं. त्या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहेत. मात्र २०२० मध्ये जेव्हा लॉकडाउन लागला होता तेव्हा निवेदिता यांना तब्बल ३ वेळा करोनाची लागण झालेली ही गोष्ट फारशी कुणाला ठाऊक नव्हती आणि त्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला. निवेदिता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.