

NIVEDITA SARAF
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मराठी सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपटात काम केलंय. फक्त चित्रपटच नाही तर अनेक मालिका आणि नाटकातही त्या दिसतात. निवेदिता आज ६३ वर्षांच्या आहेत. मात्र त्या त्यांच्या खाण्यापिण्याची प्रचंड काळजी घेताना दिसतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निवेदिता यांनी त्या इंटरमीडिएट फास्टिंग करत असल्याचं सांगितलं. ज्यामुळे त्यांचं वजन नियंत्रणात राहतं. निवेदिता करत असलेल्या इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय आणि ते त्या कशा करतात, जेवणात काय खातात याबद्दल त्यांनी या मुलाखतीत सांगितलंय.