
'आई कुठे काय करते' या मालिकेने महिन्याभरापूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल ५ वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. या मालिकेवर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम होतं. कितीतरी महिने ही मालिका टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. मालिकेतील अरुंधती या पात्राने मालिकेचा सर्व डोलारा स्वतःच्या खांद्यावर पेलून धरला होता. मालिकेत मधुराणी प्रभुळकर हीने अरुंधतीची भूमिका साकारली होती. मात्र मधुराणी या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हतीच.