
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचा संबंध आजवर अनेक इतर क्षेत्रांशी जोडला गेला आहे. अगदी राजकीय क्षेत्राशीही बॉलिवूड कलाकारांचा जुना संबंध आहे. काही फिल्मी घराण्यांचे तर राजकीय घराण्यांशी जवळचे संबंध आहेत. अगदी भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही बॉलिवूड मधील एका आघाडीच्या कुटूंबातील मुलीशी राजीव गांधी यांचं लग्न व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती.