
nupur shikhare
esakali
आमिर खान याची मुलगी आयरा खान हिने नुपूर शिखरे याच्याशी लग्नगाठ बांधली. ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. नुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. तो आमिर खानसाठीदेखील फिटनेस ट्रेनर म्हणून काम करायचा. त्याच्यासोबतच तो नूपुरलादेखील कोच करायचा. याच दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. कौटुंबिक अडचणींमुळे आयरा नैराश्यात गेली होती. त्यानेच तिला यातून सावरायला मदत केली. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा त्याने ही गोष्ट आईला सांगितली तेव्हा यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती हे त्यांनी आता एका मुलाखतीत सांगितलंय.