

onkar bhojane
esakal
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता ओंकार भोजने आपल्या अभिनयामुळे चर्चेत असतो. त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांसाठी वेगळी ठरते. मात्र सध्या ओंकार एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. ओंकारने 'अफरातफरी' या सिनेमाच्या दिग्दर्शक आणि सहनिर्माते मिलिंद झुंबर कवडे यांच्याविरीधात मानहानीचा दावा ठोकला आहे. या दाव्यानुसार त्याने कवडे यांना ५० लाखांची अब्रुनुकसानी भरपाई मागितली आहे. एका मुलाखतीत मिलिंद यांनी ओंकारबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे ओंकारने हे पाऊल उचललं आहे.