तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

ONKAR BHOJANE ANSWERE ON DIRECTORS CLAIMS: लोकप्रिय मराठी अभिनेता ओंकार भोजने याने त्याच्यावर दिग्दर्शकाने केलेल्या आरोपांवर उत्तर दिलं आहे.
ONKAR-BHOJANE

ONKAR-BHOJANE

esakal

Updated on: 

मराठमोळा अभिनेता ओंकार भोजने याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्याच्या मेहनतीच्या जोरावर तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पासून वेगवेगळ्या चित्रपटात दिसला. त्याच्या 'सरला एक कोटी या चित्रपटातील अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली. मात्र सध्या ओंकार वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ओंकारने 'अफरातफरी' नावाचा सिनेमा केला होता. जो आता प्रदर्शित होणार आहे. मात्र आता तो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत नाहीये असा आरोप त्याच्यावर केला जातोय. या आरोपांवर आता ओंकारनेही मौन सोडलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com