
छोट्या पडद्यावर सध्या नवीन मालिकांचा तडाखा सुरू आहे. जुन्या मालिकांचा टीआरपी चांगला नसेल तर त्या मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनेलकडून घेतला जातो आणि त्याजागी नवीन मालिका आणल्या जातात. आता स्टार प्रवाह आणि झी मराठीवर अशाच काही नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली होती. त्यात झी मराठीवर दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर झी मराठीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा टीआरपी कमी असल्याने हा निर्णय घेतला गेला असल्याचं बोललं जातंय.