
Paaru Serial Update: छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीच्या. मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. काही मालिका तर प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडतात. त्यातील एक लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील पारू. सगळं काही सुरळीत सुरू असताना त्यात ट्विस्ट आला नाही तर ती मालिका कसली? आता 'पारू' मालिकेतही नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत अहिल्यादेवींना टक्कर देण्यासाठी जुन्या खलनायिकेची एंट्री होणार आहे.