पांडुरंगाची सेवा की कीर्तनाचा बाजार? कसा आहे 'पाच फुटाचा बच्चन' सिनेमा?

PACH FOOTACHA BACHCHAN MOVIE REVIRE MARATHI: कीर्तन, अध्यात्म आणि व्यावसायिकतेच्या संघर्षावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
paach futancha bachchan movie review

paach futancha bachchan movie review

esakal

Updated on: 

आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या सांस्कृतिक वारशामध्ये भक्तिपरंपरेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भजन आणि कीर्तन याच परंपरेचा एक भाग आहे. भक्तिरसामध्ये कीर्तनाला मानाचे स्थान आहे. अनेक संतांनी आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन केले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत कीर्तन आणि कीर्तनकारांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. संतपरंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या कीर्तनाने अध्यात्माबरोबरच समाजप्रबोधनाचेही काम केले. मात्र काळाच्या ओघात कीर्तनाचे स्वरूप कसे बदलत गेले... कीर्तनामध्ये स्पर्धा कशी वाढत गेली... त्याला व्यावसायिक स्वरूप कसे प्राप्त झाले...याच विषयावर परखडपणे भाष्य करणारा चित्रपट म्हणजे ‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com