कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

PACH-FUTACHA-BACHCHAN-MARATHI-MOVIE-TRAILER RELEASE: ‘पाच फुटाचा बच्चन’चा ट्रेलर रिलीज; श्रुती मधुदीपच्या दमदार पदार्पणासह कीर्तन, कोल्हापुरी भाषा आणि तरुणीच्या संघर्षाची वेगळी कहाणी
paach futancha bachhan

paach futancha bachhan

esakal

Updated on: 

कीर्तनातून प्रसिद्धीस आलेल्या एका तरुणीची गोष्ट सांगणाऱ्या 'पाच फुटाचा बच्चन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीजरला भरभरून मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट ९ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. मूळ प्रायोगिक एकपात्री नाटकातून मांडण्यात आलेल्या या गोष्टीला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. मराठी मनाची नस पकडेल अशा या नाटकाचे चित्रपटात रूपांतर झाले आहे. नाटकातून चित्रपटात रूपांतर होण्याच्या या दैदीप्यमान यादीत या चित्रपटाचे नाव जोडले गेल्याने या चित्रपटाविषयीचं कुतूहल वाढलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com