![Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."](http://media.assettype.com/esakal%2F2024-05%2Fb514ca5b-99fb-4e78-9bef-857bce2420ef%2Fbadhsah.jpg?rect=0%2C0%2C1280%2C720&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Badshah: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर (Hania Amir) आणि प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. बादशाह आणि हानिया हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यामुळे बादशाह हा हानियाला डेट करत आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अशातच आता एका मुलाखतीमध्ये हानियानं बादशाहसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे.
BBC Asian Network, च्या मुलाखतीत बादशाहबाबत एक प्रश्न हानियाला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना हानिया म्हणाली, "बादशाहनं माझ्या एका रिलवर कमेंट, त्यानंतर त्यानं मला मेसेज केला होता. बादशाह हा माझा खूप चांगला मित्र आहे. तो खूप चांगला व्यक्ती देखील आहे, त्यामुळेच तो माझा चांगला मित्र आहे."
मुलाखतीमध्ये हानियाला विचारण्यात आलं की, "तुझं सध्याचं आवडतं गाणं कोणतं आहे?" या प्रश्नाचं उत्तर हानियानं दिलं, 'God Damn' यावर मुलाखत घेणारा म्हणाला की, "हे गाणं बादशाहचं आहे, त्याच्या आणि तुझ्या डेटिंगची चर्चा सध्या होत आहे." यावर हानिया म्हणाली, "मला कधीकधी वाटते की, माझा एकच प्रॉब्लेम आहे की, मी लग्न केलं नाही. जर मी लग्न केलं असतं तर अशा अनेक अफवांपासून मी वाचले असते."
मुलाखतीमध्ये हानियाला बादशाहच्या गाण्यांबाबत काही प्रश्न देखील विचारण्यात आले. या प्रश्नांमधील काही प्रश्नांची उत्तरं हानियानं बरोबर दिली.
काही दिवसांपूर्वी हानिया आणि बादशाह हे दुबईमध्ये एकत्र स्पॉट झाले. या दोघांनी एकमेकांचे दुबईमधील फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. त्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.