

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडल्याच्या कारणाबाबत आता धक्कादायक खुलासा झाला आहे. अभिनेता आणि निर्माता विद्यान माने यांनी पलाशवर फसवणुकीचे आरोप करताना अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. पलाश बेडवर दुसऱ्या तरुणीसोबत रंगेहाथ सापडला होता. यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघातील इतर खेळाडूंनी पलाशची तिथेच धुलाई केली होती असंही विद्यान माने यांनी म्हटलंय. स्मृती मानधना आणि विद्यान मित्र आहेत. विद्यानची पलाशसोबत स्मृतीचे वडील श्रीनिवास यांनीच ओळख करून दिली होती.