सातव्या महिन्यात डिलिव्हरी, माझ्या अंगाला सूज, एका रात्रीत आयुष्य बदललं; मराठी मालिकांची लीड हिरोईन, आता काय करते?

MARATHI TV ACTRESS LIFE CHANGES AFTER FIRST PREGNANCY: अशी एक मराठी अभिनेत्री जी कधीकाळी मालिकांची लीड हिरोईन होती. मात्र गरोदरपणानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदललं.
PALLAVI WAGH LIFE CHANGES AFTER PREGANANCY

PALLAVI WAGH LIFE CHANGES AFTER PREGANANCY

ESAKAL

Updated on: 

मराठी असो हिंदी असो असे अनेक कलाकार आहेत जे कधीकाळी मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र अचानक ते पडद्यावरून गायब झाले. ही गोष्ट पुरुष कलाकारांपेक्षा स्त्री कलाकारांसोबत जास्त पाहायला मिळते. त्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे प्रेग्नन्सी. स्त्री कलाकार प्रेग्नन्सीमध्ये ब्रेक घेतात. मात्र त्यानंतर त्यांना म्हणावं तसं कमबॅक करता येत नाही. कुणी कुणी तर हे क्षेत्रचं सोडून देतं. अशीच एक गाजलेली अभिनेत्री जिने प्रेग्नन्सीदरम्यान ब्रेक घेतला. मात्र त्यानंतर ती १२ वर्ष कमबॅक करूच शकली नाही. आता तिने आपला तो अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com