Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वेब सीरिजच्या टीमनं केलेलं हटके प्रमोशन दिसत आहे.
Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Panchayat 3: गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक 'पंचायत' (Panchayat) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या वेब सीरिजच्या गेल्या दोन सीझन्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अशातच आता या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या रिलीज डेटची घोषणा देखील करण्यात आली आहे. सध्या या वेब सीरिजची टीम हटके पद्धतीनं या सीरिजचं प्रमोशन करत आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वेब सीरिजच्या टीमनं केलेलं हटके प्रमोशन दिसत आहे.

भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव

सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भाजी मंडईतील दुधीभोपळ्यांवर पंचायत वेब सीरिजचं नाव आणि रिलीज डेट लिहिली आहे. हा दुधीभोपळा भाजी मंडईत विकण्यासाठी ठेवला आहे. म्हणजे भाजी घ्यायला आलेल्या लोकांची नजर या दुधीभोपळ्यावर पडले आणि लोकांना या वेब सीरिजची रिलीज डेट कळेल. नेटकऱ्यांना वेब सीरिजच्या प्रमोशनची ही हटके पद्धत आवडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भाजी मंडईतील व्हिडीओला कमेंट करुन अनेकजण या प्रमोशनच्या हटके आयडीयाचं कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल
Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

पंचायत वेब सीरिज आणि दुधीभोपळ्याचं कनेक्शन काय?

‘पंचायत’ या वेब सीरिजचे आणि दुधीभोपळ्याचे खास कनेक्शन आहे. वेब सीरिजमधील ब्रिजभूषण दुबे हे अभिषेक कुमारला दुधीभोपळा देत असतात. जितेंद्र कुमार जेव्हा-जेव्हा त्यांच्या घरी जातो तेव्हा त्याला दुबेजींकडून दुधीभोपळा मिळत असतो. त्यामुळेच ‘पंचायत’ या वेब सीरिजच्या टीमनं प्रमोशनसाठी दुधीभोपळ्याचा वापर केला आहे.

'या' दिवशी रिलीज होणार वेब सीरिज

28 मे रोजी 'पंचायत 3' ही वेब सीरिज ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिजमध्ये  जितेंद्र कुमार, रघुबीर यादव आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल
Panchayat 3: 'पंचायत 3'मध्ये येणार मोठा ट्विस्ट, फुलेरामध्ये येणार नवा सचिव? त्रिपाठीजींची जागा कोण घेणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com