
Marathi Entertainment News : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीत रमून गेला आहे. पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेण्यासाठी लहानापासून थोरांपर्यंत अभंग गात वारीतून जात आहेत. आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी अनेकजण आसुसले आहेत. अशीच गोष्ट सांगणाऱ्या पंढरीची वारी या सिनेमाने सगळ्यांची मनं जिंकली. 1988 साली रिलीज झालेला हा सिनेमा आजही लोकप्रिय आहे. आषाढी एकादशीला हा सिनेमा आवर्जून टीव्हीवर दाखवला जातो. पण या सिनेमाची ओळख शापित सिनेमा म्हणूनही आहे.