
(वासिंद, कृष्णा शेलार )
Latest Hasya Jatra News: प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दुर्गुणाचा चांगल्या दृष्टीने विचार करून व्यवसाय क्षेत्रात वापर करा. देवाने जन्माला घातलेला प्रत्येक व्यक्ती करेक्ट असतो. त्यामुळे पालकांनी, शिक्षकांनी मुलांना जे आवडतं त्याकडे विशेष लक्ष द्या. मी आज जे काही आहे ते मला आवडणाऱ्या गोष्टी केल्या त्यामुळेच इथपर्यंत आहे.
मुलांची एकमेकांशी कंपॅरिझन करू नका. मुलांकडे भरलेल्या ग्लासाप्रमाणे बघा. रिकाम्या ग्लासाप्रमाणे बघू नका. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांनी सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात केले.