

AJAY PURKAR
ESAKAL
लोकप्रिय मराठी अभिनेते अजय पुरकर यांनी मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटातही दमदार भूमिका बजावल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांवरील शिवराज अष्टक या आठ चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारणारे अजय पुरकर नुकतेच 'अभंग तुकाराम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. त्यांची 'पावनखिंड' या चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका प्रचंड गाजली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. मात्र या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहुनमराठी सिनेसृष्टीतील कुणीही त्यांना कौतुक करण्यासाठी फोन केला नव्हता.