

Phula Movie Director On Real Life Incident
esakal
Marathi Entertainment News : महाराष्ट्राच्या मातीतील समृद्ध पण तितकीच गुंतागुंतीची लोकपरंपरा म्हणजे वाघ्या-मुरळी. याच पारंपरिक लोकसंस्कृतीवर आधारित ‘फुला’ हा चित्रपट येत्या १७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडीसारख्या ग्रामीण भागातील नवोदित तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट साकारला आहे. मुरळीच्या पोटी जन्मलेल्या एका निरागस मुलीची ही कथा असून तमाशा फड, जागरण आणि गोंधळ अशा पारंपरिक पार्श्वभूमीवर ती आकाराला येते.