

colors marathi serial time changed
esakal
छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. त्यातलय एका कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तो कार्यक्रम म्हणजे कलर्स मराठीवरील ''बिग बॉस मराठी'. येत्या ११ जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र वाहिनीने कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केल्यावर हा कार्यक्रम किती तास असणार आहे हे स्पष्ट केलं नव्हतं. आता बिग बॉस मराठी ६ ची वेळ समोर आलीये. सोबतच या कार्यक्रमासाठी कलर्स वाहिनीवर मोठे बदल करण्यात येणार आहेत. वाहिनीवरील सगळ्या कार्यक्रमांच्या वेळा बदलण्यात आल्यात. तर एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.