
songs of paradise
esakal
लेखक- युवराज माने
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये १९५०च्या दशकात आपल्या जादुई आवाजाने जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या पद्मश्री राज बेगम या प्रख्यात गायिकेच्या संगीतावर आधारित असणारा ‘साँग्स ऑफ पॅराडाईज’ नुकताच ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. काश्मीरमधील एका अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर एक प्रथितयश गायिका म्हणून प्रस्थापित होण्याचा संघर्षमय प्रवास या चित्रपटातून उलगडला गेला आहे.