
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावलं. ती लोकप्रिय अभिनेते कबीर बेदी यांची मुलगी आहे. अभिनेते कबीर बेदी हे कायमच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांची चार लग्न झाली आहेत. त्यांचं पहिलं लग्न प्रसिद्ध डान्सर,मॉडेल प्रतिमा बेदी यांच्याशी झालं होतं. पूजा ही त्यांचीच मुलगी. तिला सिद्धार्थ नावाचा भाऊ देखील आहे. नुकतीच पूजाने या मुलाखत दिली. ज्यात तिने तिची आई प्रतिमा हिच्याबद्दल आणि तिच्या गूढ मृत्यूबद्दल भाष्य केलंय.