
POOJA BIRARI
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. विषय आहे तिच्या लग्नाचा. काही दिवसांपूर्वी पूजा आणि लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर प्रेक्षकांना आश्चर्य वाटलं होतं. ही बातमी खरी की खोटी याबद्दल तर्कवितर्क लावले जात होते. पूजाने मात्र त्यावर बोलणं टाळलं होतं. आता अखेर एका मुलाखतीत तिने त्यांच्या लग्नाबद्दल मौन सोडलंय. तिने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिलीये.