

POOJA BIRARI
ESAKAL
'वेड लागलं प्रेमाचं' मालिकेतील लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा बिरारी हिने काही दिवसांपूर्वीच आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात विवाह केला. या लग्नाला अनेक कलाकार हजर होते. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेच्या सेटवर केळवणादरम्यान पूजाने उखाणा घेत सोहमवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. मुंबईतही मोठ्या थाटामाटात त्यांचं रिसेप्शन पार पडलं. आता लग्नानंतर त्यांनी लगेचच कामाला सुरुवात केलीये. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पूजाने त्यांचं लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे याबद्दल सांगितलंय.