

pooja birari in yetech ata mi nandayala
esakal
झी मराठीवर लवकरच 'येतेच आता मी नांदायला' ही मालिका सुरू होतेय. या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आलेला. ती मालिकेत शिवानी कदम ही भूमिका साकारतेय. हुशार, शिस्तप्रिय, आत्मविश्वासू आणि आयुष्याचा आनंदाने स्वीकार करणारी शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पूजाने या मालिकेच्या शूटिंगचा अनुभव सांगितलाय.