

pooja birari on suchitra bandekar
esakal
'स्वाभिमान', 'येड लागलं प्रेमाचं' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा बिरारी ही आता बांदेकरांची सून आहे. तिने सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांच्या मुलाशी लग्न केलंय. लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये हे लग्न पार पडलं. आता लग्नानंतर पूजाने पहिल्यांदाच तिच्या सासरच्या मंडळींबद्दल भाष्य केलंय. नुकत्याच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत पूजाने सासूबाई सुचित्रा बांदेकर यांच्याबद्दल आणि त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितलं आहे.