

pooja sawant
esakal
मराठी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. आगामी मराठी चित्रपट 'कपबशी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघालेल्या टीमच्या गाडीचा अपघात झालाय. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रवास करत असताना सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे या टीमच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालं असलं, तरी गाडीतील सर्व जण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'कपबशी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम पुणे येथून सांगलीच्या दिशेने कारने रवाना झाली होती. सातारा जिल्ह्यातील काशीळ गावाजवळ महामार्गावर अचानक ३ वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातात कलाकारांची कारही भरडली गेली.
pooja sawant car accident
esakal