

salbardi
esakal
मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय.मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. नुकताच 'सालबर्डी' या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.