

POOJA SAWANT
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या सौंदर्याने तिने प्रेक्षकांना भुरळ घातलीये. पूजाला नेहमीच तिच्या फिटनेसबद्दल आणि रूटिनबद्दल विचारण्यात येतं. तिचा आहार, व्यायाम याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पूजाने तिचं रुटिन सांगितलं आहे. तिने नुकतीच लोकमत सखीला मुलाखत दिली. यात बोलताना ती तिच्या स्कीनची कशी काळजी घेते याबद्दल सांगितलंय.