
Marathi Entertainment News : हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले असून या भन्नाट विनोदी चित्रपटात निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे व किरण गायकवाड या तीन मित्रांची अतरंगी कहाणी पाहायला मिळणार आहे.