Poonam Pandey
esakal
Poonam Pandey Meets Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात अनेक सेलिब्रिटी दर्शनाला गेल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक सेलिब्रिटींचे श्रद्धास्थान असलेल्या प्रेमानंद महाराजांपुढे ते नतमस्तक होतात. बॉलिवूडपासून ते क्रिकटर्सपर्यंत सगळे सेलिब्रिटी प्रेमानंद महाराजांची भेट घेत असतात. अशातच आता बोल्ड कंटेटसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूनम पांडे हिने प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. परंतु तिला आश्रमात पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलय.