

sanjay mishra
esakal
आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्र जिवंत करणारे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट सिनेमांमध्ये काम केलंय. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक झालंय. मात्र संजय मिश्रा यांनी काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. खरं तर आपण मरणार आहोत असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे ते मुंबईतून पळून गेले होते. एका मुलाखतीत मिश्रा यांनी याबद्दल सांगितलं आहे. त्यात त्यांच्याकडून वडिलांचा अपमान झालेला असंही त्यांनी म्हटलंय.