
सिनेसृष्टीमधे का मिळवणं सोपं नाही. असे अनेक कलाकार आहेत जे कामाशिवाय घरी बसून आहे. कुणी सोशल मीडियावर काम मागताना दिसतं. तर कुणी आपल्याला रिप्लेस केलं गेल्याचं सांगतं. आजवर केवळ छोटेच नाही तर मोठमोठे कलाकारही ऐनवेळेस चित्रपटातून रिप्लेस केले गेलेत. आधी चित्रपटासाठी निवड झालेल्या कलाकारांना दुसऱ्या जवळच्या व्यक्तीसाठी सिनेमातून काढलं जातं. अशात स्टार कीडला जास्त महत्व मिळताना दिसतं. अशाच एका स्टार कीडसाठी एका चांगल्या कलाकाराला अजय देवगने त्याच्या चित्रपटातून काढून टाकलं.