

HARSHADA KHANVILKAR AT AKSHAYA DEODHAR SHOP
ESAKAL
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर (HARSHADA KHANVILKAR) अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या आणि त्यातल्या सगळ्याच भूमिका गाजल्या. त्यांच्या अक्कासाहेब तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. सध्या हर्षदा झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' (LAXMI NIWAS)या मालिकेत दिसतायत. सध्या त्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हर्षदा यांनी नुकतीच ऑनस्क्रीन लेक म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर (AKSHAYA DEODHAR) हिच्या दुकानाला भेट दिली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.