

leena chandvarkar
esakal
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. लीना चंदावरकर यांचं नावही याच यादीत घेतलं जातं. ६०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७०च्या दशकात त्यांच्या साधेपणाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र, संजीव कुमार, विनोद खन्ना, दिलीप कुमार आणि सुनील दत्त यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं. मात्र, लीना यांची कहाणी केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नव्हती. त्यांच्या खासगी आयुष्यातही अनेक चढ-उतार आले, ज्यामुळे त्यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखंच वाटतं.