

RASHMIKA MANDANA
ESAKAL
८० च्या दशकातील लोकप्रिय दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावलं. आजही त्यांचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. त्यांनी 'रोटी, 'तेरे मेरे सपने' सारख्या हिट चित्रपटात काम केलं. 'फौलाद वीर भीमसेन', 'टात्यांनी र्जन कम्स टू देल्ही', 'सिकंदर-ए-आजम', 'रूस्तम-ए-हिंद', 'राका', और 'डाकू मंगल सिंह' हे त्यांचे चित्रपटही चांगलेच गाजले. १९७४ मध्ये मुमताज यांनी बिझनेसमन मयूर माधवानी यांच्याशी लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुमताज यांनी हिंदू मुस्लिम धर्मातील भिन्नतेबद्दल आणि देवी- देवतांबद्दल भाष्य केलंय.