

PRAJAKTA mali big decision
esakal
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची वेगळी काही ओळख करून देण्याची गरज नाही. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. तिने आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांवर मोहिनी घातली. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून तिला खरी लोकप्रियता मिळाली. आज प्राजक्ता माळी तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ती कोट्यवधींची मालकीण आहे. तिचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. आता वाढदिवशी प्राजक्ताने एक मोठा निर्णय घेतलाय. पोस्ट करत तिने याबद्दल सांगितलंय.