

SHWETA PENDSE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील नव्याने सुरू झालेली मालिका 'वचन दिले तू मला' ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. स्टार प्रवाहवर नव्याने सुरू झालेली ही मालिका आता प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. या मालिकेत 'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्री अनुष्का सरकटे मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत मालिकेत इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत आहे. तर 'आई कुठे काय करते' या मालिकेतील मिलिंद गवळी नकारात्मक भूमिकेत आहेत. मात्र या मालिकेत एक जुना चेहराही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एका लोकप्रिय अभिनेत्रीने तब्बल ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.